संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र व केशव स्मुर्ती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून ३० वर्षीय श्री अनिल चव्हाण या युवकाचे पुनर्वसन.

Khozmaster
3 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव,केशवस्मुर्ती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व बेघर निवारा केंद्र प्रकल्पाचे प्रयत्नाला यश . ( कोल्हापूर येथील हरविलेला युवक पालकांच्या स्वाधीन ) कोल्हापूर येथून हरविलेला 30 वर्षीय युवकाला रविवारी दि 20/11/2022 ला केशवस्मुर्ती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व बेघर निवारा केंद्र यांच्या प्रयत्नांनी त्या युवकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले . त्यामुळे पालकांचा आनंद गगनात भावेनासा झाला आहे . दि 19/11/2022 शनिवारी हा युवक जळगाव रेल्वे स्थानकावर समतोल प्रकल्पाचे समनव्यक प्रदिप पाटील , व RPF चे जवान सी , जे . चौधरी यांना हा युवक एकटा भटकताना दिसून आला , या युवकाला विचारपूस केली , मात्र तो युवक गोंधळलेल्या स्थितीत दिसून आला . त्या युवकाला पुढील विचारपूस साठी प्रदिप पाटील यांनी त्यांचे रेल्वे स्थानक येथील समतोल प्रकल्पाच्या ऑफिस ला आणले, त्यांना आपलेसे केले , विश्वासात घेतले , व त्या युवका कडून घरची माहिती घेऊन संपर्क नंबर मिळविला , दिलेल्या नंबर वरती संपर्क केला असता , तो नंबर युवकांच्या भावाला लागला त्यामुळे लगेच ओळख पटली , व त्यामुळे घरात परिवारात आई , वडील , भाऊ , व पत्नी , यांचा आनंद गगनात भावेनासा झाला , दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधून या युवका विषयी माहिती देण्यात आली . हा युवक त्यांचाच मोठा भाऊ निघाला , हा युवक गोकुळशिरी midc कोल्हापूर येथून 14 /11/2022 पासून मिसिंग झालेला होता , अधिक माहिती युवकाला विचारले असता , मी कसा आला , कोणी आणले मला काही ही माहिती नाही , अस युवकाचे मनःणे आहे , युवकाची कोल्हापूर गोकुळशिरी midc पोलीस स्टेशनला मिसिंग ही दाखल होती , युवकाला काळजी व सुरक्षेसाठी निवाऱ्यासाठी बेघर निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले होते . आज दि 20/11/2022 रविवारी युवकाचा परिवार युवकाला घेण्यास आले , त्यावेळी त्या युवकाला पाहून परिवाराच्या सदस्यांनी खुप आनंद व्यक्त केला , त्यांनी संस्थेचे व संस्था कर्मचारी यांचे आभार मानले , व संस्थेच्या , कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या , यांनी बजावली विशेष कामगिरी समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक भानुदास येवलेकर ,समनव्यक प्रदिप पाटील , तांत्रिक तज्ञ व्यवस्थापक म.न.पा सौ गायत्रीताई पाटील . संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे अध्यक्ष श्री गणेश पाटील , समतोल प्रकल्पाचे टिम सदस्य विश्वजित सपकाळे , भारती मरसाळे, RPF चे जवान सी जे . चौधरी व संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी , काळजी वाहक राजेंद्र मराठे ,हर्षल वंजारी, सौ शितल काटे यांच्या प्रयत्नाने हरविलेल्या युवकाला आई , वडील , भाऊ , पत्नी , व मुलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मौलाचा वाटा उचलला .
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *