शिवसेना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत (सहसंपादक) औरंगाबाद
विनोद घोसाळकर सोयगाव
शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोके-बिके, गद्दार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन रविवारी शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी सोयगाव येथील आढावा बैठकीत केले.सोयगाव तालुका खरेदी विक्री संघ येथील शिवसेना आढावा बैठकीच्या मंचावर उपनेते विनोद घोसाळकर, मुबई येथील आमदार व महिला संपर्क प्रमुख मनीषा कायंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन जिल्हा अध्यक्ष राजू राठोड, सविता निगोळे, सुकन्या भोसले तालुका अध्यक्ष दिलीप मचे, महिला आघाडीच्या लताबाई चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना मरगळ झटकून सोयगाव तालुक्यातील प्रत्येक वस्ती , तांडे, गाव व शहरात पक्षाच्या वाढीसाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्यात होऊ घातलेल्या पाच ग्राम पंचायतीवर शिवशाही पॅनलचा भगवा फडकविण्याचे आवाहन केले.आमदार मनीषा कायंदे यांनी महिला कार्यकर्त्यानी आपल्या घरापासून सदस्य नोंदणी सुरु करुन कुटूंबातील प्रत्येकास सदस्य करण्यासह महिलांनी राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले.
शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी आपल्या भाषणात आवर्जून राज्यपाल कोष्यावरी तसेच केबिनेट मंत्री सत्तार यांचा उल्लेख करीत हे दोघेही महाराष्ट्रातील महापुरुष,मराठी माणसांचा व महिलांचा वारंवार अपमान करीत असल्याने त्यांचा निषेध केला.या आढावा बैठकीस माजी तालुका अध्यक्ष डॉ रघुनाथ फूसे, माजी शहर प्रमुख दिनेश हजारी,उपतालुका अध्यक्ष गुलाब कोलते, चंद्रहास रोकडे, रवींद्र काटोले,परशराम पवार, विठ्ठल बोराडे, दीपक बागुल,चांदीबाई पठाण,लताबाई चौधरी,कैलास पवार,दिलीप पदमे,रमेश राठोड,सुनिल जयस्वाल, सागर पाटील, स्वप्नील पाटील, भारत जाधव, धारमसिंग सोळंके,माजी उपसभापती सुपडू पाटील, साहेबराव सोनवणे, अमृत राठोड, विनोद जाधव, विलास राठोड, इश्वर सपकाळ, दशरथ गव्हांडे, समाधान पाटील,भगवान पालकर, अतुल बोरसे,आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.
चौकट : यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप मचे यांनी सोयगाव तालुक्याची माहिती अपडेट केल्याने त्यांचे कौतुक केले.
फोटो ओळ :- सोयगाव येथील शिवसेना आढावा बैठकीस मार्गदर्शन करतांना उपनेते विनोद घोसाळकर व मंचावर बसलेले आ. मनीषा कायंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा अध्यक्ष राजू राठोड, तालुका प्रमुख दिलीप मचे,
0 9 4 7 7 5
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *