सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील हिवरी,मोलखेडा येथे रविवार रोजी सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधान्याची निर्मिती करण्यात आली. या वनराई बंधारा निर्मितीसाठी कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर,स्वानंद पाटील यांनी स्वतः परिश्रम केले.या वनराई बंधाऱ्याच्या पासून शेतकऱ्यांना व जनावरांना याचा लाभ होईल अशे कृषी सहाय्यक मानसिंग भोळे यांनी यावेळी सांगितले.तसेच याप्रसंगी प्रगतशील शेतकरी स्वानंद पाटील, ज्ञानेश्वर मखसर,विजय पाटील, विशाल अनगायते, संजय चोपडे, गणेश शिंदे,आकाश क्षीरसागर, सोपान मांडे,मयूर दाणे यांनी वनराई बंधारे निर्मितीसाठी सहकार्य केले.
