शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात पातुर येथे शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बापू देशमुख, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,शिवसेना तालुकाप्रमुख रवीभाऊ मुर्तडकर यांच्या मार्गदर्शनात

पातुर येथील टीकेव्ही चौकामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात रस्ता रोको आंदोलन आज 21 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर, शिवसेना उपशहर प्रमुख निरंजन बंड, युवासेना शहरप्रमुख अब्दुल मुक्तार, चोंढी सर्कल प्रमुख गणेश घुगे, सुनील भाऊ गाडगे, परसराम उंबरकर, देवलाल भाऊ डाखोंरे,युवासेना उपतालुकाप्रमुख शिवा निलखन, विशाल तेजवाल, सुधाकर शिंदे, नंदू येनकर,अनिल निमकंडे, अंबादास देवकर,कैलास बगाडे, दीपक देवकर,सचिन गिरे, युवासेना उपशहर प्रमुख संतोष उगले,संतोष देवकर,सुभाष राखोंडे,रामदास धनोकार, रामदास बंड, सुरेश सुखदेव घुगे, विशाल सोनोने आधी सह इतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा यावेळी समावेश होता

यावेळी अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने नुकसान झाल्याने त्यांना सरसकट पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी पिक विमा अग्रीम 25 टक्के तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत महात्मा ज्योतिबा फुले प्रस्थान पर पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे पूरग्रस्तांचे व खरडून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा तात्काळ करण्यात यावी आधी मागण्यांचा यावेळी समावेश करण्यात आला आहे

सदरचा रस्ता रोको शांततेत पार पाडण्यात आला आहे यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता पातुरचे ठाणेदार हरीश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी, वसंत राठोड, रामानंद भवाने यावेळी उपस्थित होते

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *