अखंड रघुवंशी समाज कल्याण महापरिषदेच्या महिला मंडळाच्या उपक्रम

Khozmaster
1 Min Read
नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भोपाळ येथे अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी नंदुरबार
येथील नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भोपाळ येथे गरजूंना अत्यावक्षक वस्तूंची वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन अखंड रघुवंशी समाज कल्याण महापरिषदेच्या महिला मंडळातर्फे करण्यात आले होते. भोपाळ येथे अखंड रघुवंशी समाज कल्याण महापरिषदेच्या महिला मंडळातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. नुकतेच मनीषा मार्केट परिसरामध्ये दान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नंदुरबार नगरपालिकेचे नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व नगरसेविका स्नेहलता भगवत रघुवंशी यांच्या हस्ते गरजूंना अत्यावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेकडो गरजूंनी लाभ घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष.रत्ना रघुवंशी व नगरसेविका स्नेहलता रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.अखंड रघुवंशी समाज कल्याण महापरिषदेच्या महिला मंडळातर्फे आयोजित उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.  यशस्वीसाठी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *