अकोट प्रतिनिधी विशाल गवई तालुक्यातील देवरी फाटा वरील वेताळबाबा मंदिर परिसरात अकोट तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महत्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली.थेट जनतेतून सरपंच निवड करण्याच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हि प्रत्यक्ष सहभाग घेणार असुन ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी वंचित सहभाग घेणार नाही पण सरपंच पदासाठी वंचित बहुजन आघाडीची प्रत्यक्ष आपले उमेदवार उभी करणार असुन हि निवडणूक पुढील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या पक्ष पदाधिकारी यांची परिक्षाच आहे.असे समजून प्रत्येकाने अकोट तालुक्यातील ३७ पैकी किमान ३० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडी झेंडा फडकवावा असे आव्हान केले, सोबतच सरपंच जर पडले तर पडले पण जर पाडल्या गेले तर त्या पाडण्याऱ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही अशी तंबीही ह्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी बैकठीत दिली. या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष चरण इंगळे,महासचिव रोशन पुंडकर,संघटक सुरेंद्र औईंबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे, ता.प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे, महिला तालुकाध्यक्ष सुनिताताई हिरोळे, देवानंद तायडे, मंदाताई कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष, लताताई कांबळे शहरअध्यक्ष, राजुभाऊ ऐखे, शत्रुघ्न नितोने ,गटनेते धीरज शिरसाट, मुस्ताक शहा, डॉ. अनिल गणगणे, युवक आघाडी अध्यक्ष मयूर सपकाळ, निशांत राठोड, सुनील अघडते, युवराज मुरकुटे, प्रकाश राऊत,सुभाष रौंदळे,विनोद नांदुरकर, सचिन सरकटे, दिनेश सरकटे विशाल आग्रे हे होते.तर बैठकीचे सुत्रसंचलन तालुका महासचिव रोशन पुंडकर यांनी तर प्रास्ताविक पुर्व तालुकाध्यक्ष चरण इंगळे आणि आभारप्रदर्शन तालुका महासचिव नंदु मापारी यांनी केले. बैठकित अकोट तालुक्यातील धारेल येथील मंगेश रामदास राठोड, दिनोडा येथील पुरुषोत्तम गिते यांनी पक्षात जाहिर प्रवेश केला. या बैठकीला आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Users Today : 11