तेल्हारा लोकजागर मंच कार्यालय तेल्हारा येथे पार पडलेल्या बैठक मध्ये लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी हिवरखेड लोकजागर मंचच्या शहराध्यक्षपदी मनीष भुडके यांची निवड केली. यावेळी लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष मनीष भांबुरकर व जिल्हा मुख्य संघटक महेंद्र कराळे यांची उपस्थिती होती.AJFC पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष मनिष भुडके हे सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणारे व्यक्तीमत्व असून हिवरखेड शहराचे माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा संत गजानन महाराज मंदिर समितीचे व्यवस्थापक आहेत.तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातुन गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर यांच्या प्रश्नाना नेहमी आपल्या लेखणीतुन वाचा फोडण्याचे काम करत असतात.यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी मनीष भुडके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष मनीष भांबुरकर तसेच मुख्य संघटक महेंद्र कराळे यांनी मनीष भुडके यांना शुभेच्छा देत, हिवरखेड शहराध्यक्ष पदावर मनीष भुडके यांची निवड केल्याने सर्वाना सोबत घेऊन चालण्याची त्यांची ख्याती जनसामान्यांना मदतगार राहील, असे प्रतिपादन केले.यावेळी शंकरराव पुंडकर गुरुजी, दिलीप पिवाल, गोपाल जळमकर, संजय मानके, विलास अरबट, नितीन नांदोकर, मनोज राठी, डॉ. महेश खोट्टे, विश्वास पाथरीकर, सुनिल बजाज , सुनिल धुरडे,श्याम गावंडे, अमोल जवंजाळ, इत्यादी लोकजागर मंच परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
Users Today : 47