नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या : 11 मोटारसायकल हस्तगत : 02 आरोपीना ठोकल्या बेडया…

Khozmaster
8 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबा -: शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजाराच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात यश …
     सविस्तर माहिती अशी कि, प्रकाश रुपा चव्हाण , धंदा शेती रा . नांदरखेडा ता . जि . नंदुरबार यांचे मालकीची 40,000 / – रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक MH – 39 – L – 2371 ही दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेचे दरम्यान नंदुरबार शहरातील बस स्थानक समोर असलेल्या डी . एस . के . मार्केट परीसरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं . 699/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता .
     सदरचा गुन्हा हा मोटार सायकल चोरीशी निगडीत असल्यामुळे  पोलीस अधिक्षक  पी . आर . पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना सूचना दिला .
          पो. निरीक्षक कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटार सायकल बाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली .
    तसेच चोरीस गेलेल्या मोटार सायकलच्या शोधा साठी तीन पथके तयार केली .
     गुन्हे शोध पथकाला मोटारसायकलची चोरी करणारे दोन ईसम हे जगतापवाडी परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली .
     त्यानंतर पोलीस पथकाने जगतापवाडी परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे एका मोटार सायकल सह येत असतांना दिसुन आले . पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागले . त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले . त्याचेकडे ताब्यात असलेल्या मोटारसायकल बाबत विचारपुस केली असता ते आधी उडवा उडवी ची उत्तरे देवु लागले . त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाणे येथे आणले असता , विजय अंता पाडवी , रा . मटावल ता . कुकरमुंडा जि . तापी ( गुजरात राज्य ) ,
 विनेश लक्ष्मण पाडवी , रा . जुन उंटावद ता . कुकरमुंडा जि . तापी ( गुजरात राज्य ) असे सांगुन त्यांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली . त्यांचेकडे 40,000 / – रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH – 39 – L – 2371 ही मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.न. 699/2022 , भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले .
सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केली .
तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने आणखी 10 मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली .
 सदरच्या मोटारसायकली देखील,
 कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या.
 60,000 / – एक मरुन रंगाची होंडा कंपनीची सी . बी . 125 शाईन एस.पी विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं . JC73E80043074 व चेसिस नं . ME4JC732BG8020621 असा असलेली त्याबाबत शहादा पो स्टे गुरनं 460/2022 भादवि क 379 प्रमाणे दाखल, 80,000 / – काळ्या रंगाची होंडा कंपनीची सी.बी. युनिकॉर्न , मो.सा.क्रं . GJ – 26 – B – 7978 असा असलेली त्याबाबत उपनगर पो.स्टे गु.र.नं. 294/2022 भादवि क . 379 प्रमाणे दाखल, 70,000 / – एक निळ्या रंगाची सुझुकी कंपनिची एक्सेस मो.सा त्याबाबत तळोदा पो स्टे गुर.नं. 324/2022 भादवि क 379 प्रमाणे दाखल, 70,000 / – रुपये किंमतीची काळया रंगाची बाजाज कंपनीची 150 CC मोटारसायकल तिचा क्रमांक MH – 39 – M – 4188 व इंजीन क्रमांक DH2CCJ29484 व चेचिस क्रमांक खोडलेले  मिटवलेले असा असलेली जु.वा. कि . अं . , 60,000 / – एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस तिचेवर निळा पट्टा असलेली स्प्लेंडर प्लस i35 विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं . HA10AGLHAG0303 व चेसिस नं . MBLHA W087LHA94220 असा असलेली,
   60,000 / – काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो  पांढरा पट्टा असलेली मो.सा क्रं . MH – 39 – S 9532 असलेली त्याबाबत विसरवाडी पो.स्टे गु.र.नं. 353/2022 भादवि.क . 379 प्रमाणे दाखल, 70,000 / – एक राखाडी रंगाची होंडा कंपनीची सी . बी . शाईन तिचेवर निळा पट्टा असेलेली मो . सा.क्रं . MH – 39 AE – 7968 असा असलेली,
  50,000 / – एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच . एफ . डिलक्स . तिचेवर लाल पांढरा रंगाचा पट्टा असलेली मो.सा विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA11EPJ5G00068 व चेसिस नं . MBLHAR057J5G00084 असा असलेली,
 60,000 / – एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस तिचेवर पांढरा पट्टा असलेली मो . सा . विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं HA11EYM5L51808 व चेसिस नं MBLHAW125M5L03917 असा असलेली जुवा . की . अ . , 50,000 / – एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच . एफ . डिलक्स तिचेवर पांढरा पट्टा असलेली मो . सा . विना नंबर प्लेट असलेली तिचा इंजिन नं . HA11ENK5C10923 व चेसिस नं खोडलेले मिटवलेला अशा प्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहुन चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 6,70,000 / – रुपये किंमतीच्या एकुण 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात  शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे .
    तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे  अभिलेख तपासले असता आरोपी, विजय अंता पाडवी , रा . मटावल ता . कुकरमुंडा जि . तापी ( गुजरात राज्य ) , याचे विरुध्द यापुर्वी शहादा पोलीस ठाणे येथे 13 गुन्हे , तळोदा पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे , नवापुर  पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे , शिरपुर पोलीस ठाणे ( धुळे जिल्हा ) येथे 01 गुन्हा असे एकुण 18 गुन्हे दाखल आहे.
      तसेच आरोपी, विनेश लक्ष्मण पाडवी , रा . जुन उंटावद ता . कुकरमुंडा जि . तापी ( गुजरात राज्य ) याचेवर यापुर्वी अक्कलकुवा पो . ठाणे येथे 01 व शहादा पोलीस ठाणे येथे 01 गुन्हा असे एकुण 02 गुन्हे दाखल आहे .
   कारवाईत आणखी आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन नंदुरबार जिल्हयातुन चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली हस्तगत होवु शकतात असे, पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे .
    सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील  अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे  उपविभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांचे मार्गदर्शना खाली शहर  पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , अतुल बिहऱ्हाडे ,  जगदिश बार ,  संदिप गोसावी ,  भटु धनगर , बलविंद्र ईशी , स्वप्निल पगारे ,  स्वप्निल शिरसाठ ,  योगेंद्र सोनार ,  अनिल बडे , विजय नागोडे ,  इम्रान खाटीक , कल्पेश रामटेके , युवराज राठोड ,  योगेश जाधव , हेमंत बारी , भालचंद्र जगताप , अफसर शहा यांच्या पथकाने केली आहे ,
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *