आदर्श विद्यालय चिखलीचा मुलींचा बॅडमिंटनचा संघ विभाग स्तरावर..  

Khozmaster
1 Min Read
जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील १९ वर्षाखालील मुलींचा संघ फायनल मॅच मध्ये विजयी झाला या संघाची यवतमाळ येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. मुलींच्या संघामध्ये कु प्रतीक्षा परिहार 9ग( कॅप्टन )कु.श्रुती अक्कर 9ग, कु.नम्रता उन्हाळे 9ई,कु.श्रद्धा सुरडकर 10ब     या खेळाडूंचा समावेश होता. या विजेत्या संघाचा सर्व बॅडमिंटनचे कोच क्रीडा शिक्षक श्री.गुळवे सर यांचे बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी  व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने  विद्यालयाचे प्राचार्य श्री.समाधान शेळके सर  उपप्राचार्य श्री.प्रमोद ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री.रमेश जाधव सर श्री.गणेश नालिंदे सर   शिक्षक शिक्षिका भगिनींनी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *