राजकारणा ..
युती आघाडी करता
वळा कुठल्या वळणा
एवढे नक्की पहायचे
हलावा वेळी पाळणा
ते पाय आहे एकाचे
दुज्याच्या रे वहाणा
एकसंघ आहोत सारे
करत रहावा बहाणा
वेड्यात काढे दुस-या
तोचं खरोखर शहाणा
लोकांना लावा चंदन
उगाळत रहा सहाणा
वाका झुका केव्हांही
लवचिक ठेवा कणा
झुकणारनाही कधीही
हे येता जाताना म्हणा
बोलण्यात फक्त दिसो
आपला करारी बाणा
किंमत शून्यचं असते
धनुष्या शिवाय बाणा
कायमचा शत्रु न् मित्र
कोण तो राज कारणा
बदलेलं स्थिती तशी
बदलत ठेवावे धोरणा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
