प्रतिनिधी अशोक भाकरे
वाशिमच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचा आज पुन्हा अकोला रेल्वे स्थानकावर 50 खोके एकदम ओके आणि गद्दार चे नारे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिले.योगायोग म्हणजे आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी हे दोन्ही अकोला रेल्वे स्थानकावर एकाच म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस गाडीतून मुंबई साठी प्रवासासाठी पोहचले.भावना गवळीला पाहताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत प्रचंड नारेबाजी सुरू केली.मात्र भावना गवळी यांनी या नारेबाजीला कोणताही प्रतिउत्तर न देता थेट आपल्या बोगीत प्रवेश केला.मात्र या नारेबाजीने अकोला रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Users Today : 47