किशोर वाकोडे यांची प्रा.आं.मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या नांदुरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

KHOZ MASTER
1 Min Read
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी
 पत्रकार भवन जळगाव खान्देश या ठिकाणी  मानव अधिकार विषयी मार्गदर्शन या विषयावरॲड.श्री.राहुल वाघ यांचे एक दिवसीय मार्गदर्शन व नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये नांदुरा तालुक्यातील शेंबा गावचे रहिवाशी  किशोर वाकोडे यांची प्रारंभिक  आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि भारत सरकार) संघटनेच्या नांदुरा तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष  दादासाहेब दिलीप मोहिते (सर)  यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी शशिकांत दुसाने (सर) म. रा. अध्यक्ष,सौ.पुनमताई खैरनार.
 महिला प्रदेशाध्यक्षा,सौ.शोभाताई आखाडे(मोरे)महिला उपप्रदेशाध्यक्षा,
ॲड.राहुल वाघ.म. रा. कायदेशी सल्लागार,सौ.भारतीताई कुमावत उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा,हेमराज किरंगे उत्तर महाराष्ट्र हेडजनसंपर्कअधिकारी, नियुक्ती प्रसंगी वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. या मानवाधिकार संघटनेचे कार्य काय आहे याविषयी सखोल असे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष मोहिते सर यांनी केले.सध्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात काही भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्यात येते.
सर्वसामान्य नागरिकांना त्याचे काम होण्यासाठी ही संस्था मदत करत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. किशोर वाकोडे यांनी निवडीचे श्रेय  सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव प्रोत्साहित करणारे मार्गदर्शक  दैनिक परमादेश वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रा. कृष्णा मेसरे  यांना दिले आहे. या कार्यक्रमाला जळगाव ,पाचोरा, भुसावल, बुलढाणा, नांदुरा, पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *