गोळीबार सरावाच्या कारणास्तव ईदगाह मैदान परिसरात मनाई जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

Khozmaster
1 Min Read

25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई

 प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार

बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर,2022 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.पोलीस अधिकारी-कर्मचारी  यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी  कळविले आहे.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *