देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या कार्तिक लळीत उत्सवाने मंडप उत्सव व दीपोत्सवाची सांगता दिनांक नोव्हेंबर रोजी ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर येथे झाली . श्री बालाजी व पद्मावती विवाह सोहळ्या निमित्त कार्तिक मंडप व दीपोत्सवाची ४०० वर्षाची ऐतिहासिक परंपरा आजही मोठ्या भक्ती भावाने जोपासतात देऊगावकर श्री बालाजी भक्त .
शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या कार्तिक उत्सवाची सुरुवात ही कार्तिक दशमीपासून झाली या उत्सवात श्री मंदिरासमोर श्री बालाजी महाराज व पद्मावती विवाह सोहळा निमित्त मंडप आच्छादन केले होते या उत्सवात दीपोत्सव विविध फुलांचे मखर चप्पल दोघांचा नैवेद्य आणि ब्राम्हण वृंदाची अनुष्ठान समाप्ती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले .चातुर्मास भजनाची समाप्ती झाली .नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता ह भ प हरिदास महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर ठीक पाच वाजून 45 मिनिटाला दहीहंडी फोडून श्री मंदिरासमोरील मंडपाची दूर सोडून ललित उत्सव साजरा करण्यात आलात्यानंतर श्री मंदिरामध्ये गुलालाची उधळण करून महाआरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले.अश्विन आणि कार्तिक उत्सवात सहकार्य करणाऱ्या सर्व मानकरी, सेवेकरी, ब्राह्मण व पुजारी वृंद, यात्रा उत्सव समितीचे सदस्य, यात्रेत आलेले विविध व्यापारी, महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, विद्युत महामंडळ, बॅक कर्मचारी, विवीध प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, अन्नदाते सेवेकरी, पत्रकार आदींचे श्री संस्थांनच्या वतीने श्री बालाजी महाराज संस्थांचे वंशपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यवस्थापक नंदकिशोर बिडकर तसेच श्री बालाजी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी सिनखेडराजा ,तहसीलदार श्याम धनमने, मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी सर्व बालाजी भक्तांचे उत्सव काळात सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन तथा आभार व्यक्त केले.
Users Today : 23