मळसूर
येथून जवळच असलेल्या गावंडगाव येथील बाबासाहेब नाईक उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे आयोजित १७ व १९ वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुयश प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली आहे. १९ वर्षे वयोगटात
भालाफेकमध्ये पायल कंकाळ, गोळाफेकमध्ये अंजली कंकाळ, २०० मी. धावणे स्पर्धेत पूनम पायघन, ८०० मी. धावणे अंजली कंकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच १७ वर्षे वयोगटात रामप्रसाद संदीप देवकते यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत जिल्हास्तरासाठी स्थान निश्चित केले आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. संदीप तेजनकर, प्राचार्य एस. बी. चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
Users Today : 0