दुपारी ३ वाजता शनिमांडळ येथील शनी चौकात जाहीर सभा..
प्रविण चव्हाण
नंदुरबार :-राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिमांडळ ता.नंदुरबार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जाहीर सभेला ते संबोधित करतील तत्पूर्वी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ऑनलाईन भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दौरा व शनिमांडळ येथील सभेची माहिती बाळासाहेबांचा शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती दिली.ते म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ऑनलाईन भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल.त्यानंतर दुपारी ३ वाजता शनिमांडळ येथील शनी चौकात बाळासाहेबांचा शिवसेनेची जाहीर सभेला ते संबोधतील.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील बाळासाहेबांचे शिवसेनेचे नगराध्यक्ष,नगरसेवक,पंचायत समिती सभापती,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच,सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाळासाहेबांचा शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांनी केले आहे.
Users Today : 35