महाजनांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी चिखलीच्या वतीने निषेध
प्रतिनीधी रवि मगर चिखली
महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी महाराष्ट्राचे लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या परिवाराबद्दल स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या मृत्युबाबत जे निच वक्तव्य केले त्याचा निषेध करणेबाबत व गिरीष महाजन यांना मंत्रीमंडळातून वगळण्यासंदर्भात निषेध महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना तहसिलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनात नमुद असे की, स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या मृत्युच्या घटनेला आज सुमारे १० वर्ष लोटली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे एक जबाबदार मंत्री गिरीष महाजन हे महाराष्ट्राचे लोकनेत आमदार एकनाथराव खडसे यांच्या परिवाराबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे निच वक्तव्य करतात. त्यामुळे खडसे परिवाराला मानसिक यातना झाल्या असतील याचा विचार मनात येतो. या घटनेचा आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त जाहीर निषेध करत आहे. तसेच याबाबत गिरीष महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात यावे. अशि मागणी करण्यात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे चिखली विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटिल, शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर, युवक प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे, शहर कार्याध्यक्ष रहिम पठाण, नगरसेवक डाॅ प्रकाश शिंगणे,शहर उपाध्यक्ष सदानंद मोरगंजे, निंमराव देशमुख, प्रमोद चिंचोले, शेख युसुफ पत्रकार, दिलीप महाजन, सौ रत्नाताई सोळंकी, प्रशांतभाई डोंगरदिवे, विधानसभा सचिव, दामोधर टेकाळे, बबन पैठणे, समाधान डोंगरदिवे, निलेश जाटोळ, शेख अनिस, तुकाराम सोळंकी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.जिल्हा संपादक रवि मगर अशोकरत्न न्युज चैनल
Users Today : 32