रनाळे येथे चार दुकाने फोडण्याचा प्रयत्न..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
 नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकात चार दुकाने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली .याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकातील कृषी सेवा केंद्र दुकान , मोबाईल दुकान , फरसाण दुकान व किराणा दुकान अशा चारही दुकानांचे कुलूप लोखंडी सळईने तोडून चोरट्याने दुकान प्रवेश केला.दुकानात असलेल्या सामान अस्तावस्त करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला . यावेळी कोणीतरी येण्याची चाहू लागल्यामुळे चोरटा तेथून पळून गेला . याबाबत किशोर सुकदेव गोसावी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७ , ३८० , ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
  पुढील तपास पोहेकॉ . देविदास नाईक करीत आहेत .
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *