प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
नवापूर – बोरझर रस्त्यावर वनविभागाने ट्रॅक्टर मधून अवैधरित्या वाहतूक होत असलेले जळावू लाकूड जप्त केले . तसेच नंदुरबार – करंजी रस्त्यावर मोटरसायकलीवरुन अवैधरित्या वाहतूक होत असलेले ३५ हजार रुपये किमतीचे लाकूडही वनविभागाच्या दुसऱ्या पथकाने जप्त केले आहे . दोन्ही कारवाईत सुमारे सहा लाखांचा एकुण मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यात आला आहे . येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनक्षेत्र स्टाफ नवापूर – बोरझर रस्त्याने गस्त घालत असतांना खळीबर्डी येथील अज्ञात इसम ट्रॅक्टरमध्ये इंजायली जळाऊ लाकडे भरून वाहतूक करताना दिसला . सदर ट्रॅक्टरचा अटकाव केला असता चालक ट्रॅक्टर थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाला . इंजायली जळाऊ मालासह ट्रॅक्टर ( क्र . एमएच ३ ९ एन २००८ ) , ट्रॉली ( क्र . एमएच ३ ९ -६८ ९ ८ ) जप्त करून विक्री आगारात जमा केला . जप्त माल इंजयाली जळाऊ असून घन मीटर ५.००० व लाल रंगाचे ट्रॅक्टर ( क्रमांक एमएच ३ ९ एन २००८ ) , ट्रॉली ( क्र.एमएच ३ ९ .६८ ९ ८ ) या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ४ ते ४.५ लाख रूपये एवढी आहे . सदर कार्यवाही वनसंरक्षक दि.वा. पगार , उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक धनंजय ग . पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल , वनपाल भिवाजी दराडे , ए.एम. शेख , वनरक्षक कल्पेश अहिरे , संतोष गायकवाड , हिरालाल माळी , भूपेश तांबोळी , विकास शिंदे , वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली . ३५ हजाराचे सागवानी लाकूड जप्त नवापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनक्षेत्र स्टाफ खाजगी वाहनाने नवापूर – करंजी खुर्द रस्त्याने पेट्रोलिंग करताना अज्ञात इसम मोटारसायकलीने लाकडांची वाहतूक करताना दिसला . त्याचा पाठलाग केला असता सदर इसम मोटारसायकल व साग चौपाट सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला . मोटारसायकलसह साग चौपाट नग ६ जप्त करून खाजगी वाहनाने विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा केले . जप्त माल साग चौपाट नग ०६ घन मीटर ०. १३८ व हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची सीडी डीलक्स मोटारसायकल ( क्र.एमएच ३ ९ एच ४०२८ ) या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ३० ते ३५ हजार एवढी आहे .सदर कार्यवाही वनसंरक्षक दि.वा. पगार , उपवनसंरक्षक कृष्णा भवर , धनंजय ग . पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल , वनपाल भिवाजी दराडे , वनरक्षक संतोष गायकवाड , कमलेश वसावे , प्रशांत सोनार यांच्या पथकाने केली .
Users Today : 32