प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रोत्वास ८ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे . यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दत्त मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली . यात्रोत्सवानिमित्त होणारा चेतक महोत्सव देखणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील . प्रशासन आवश्यक ती मदत करेल , असे उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी येथे केले . बैठकीनंतर यात्रा स्थळांची पाहणी करण्यात आली. एकमुखी श्री दत्त यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक फेस्टीव्हल , अश्व बाजार देखणा करण्यासाठी सारंगखेडा दत्त मंदिर सभागृहात उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांच्या अध्यक्षस्थानी विविध विभागातील तालुकास्थावरील अधिकारी , कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . यावेळी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा यात्रोत्सव ग्लोबल झाला असून , यात्रेदरम्यान महिला भाविकांची उल्लेखनिय गर्दी असते . यात्रोत्सवास मोठ – मोठे सेलिब्रेटीही याठिकाणी आवर्जून हजेरी लावत असतात . यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील द तेवीस कप या स्पर्धच्या धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे . देशभरातून अश्वांना निमंत्रित करण्यात आले आहे . चेतक एन्डयुरन्स प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे . त्यात घोड्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत . त्यामुळे या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा व ज्यादा क्षमतेचे रोहित्र बसवावे . आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी . कोरोना काळानंतर दरवर्षी प्रमाणेच नियोजन असल्याने संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करून फेस्टीवलसाठी आपले योगदान द्यावे असे मत व्यक्त केले .याप्रसंगी पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ यांनी सांगितले की , सारंगखेडा यात्रा ही पारंपरिक यात्रा असून , यात्रोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल . यात्रा काळात येणा : या पर्यटकांना सोयी – सुविधांबरोबर सुरक्षाही दिली जाईल . पोलीस प्रशासन कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही . यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस , होमगार्ड व महिला पोलीसही नेमण्यात येणार आहे . यात्रोत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात . याठिकाणी रहदारी व वाहनांना अडथळा येवू नये यासाठी लेआऊटप्रमाणे व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटावीत . तसेच प्रत्येकाने अनीयंत्रही दुकानात ठेवावे , अशा सूचना दिल्या . तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांनी बांधकाम विभागाच्या आदेशाचे पालन करावे . यात्रोत्सव काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल . यात्रा काळात धुळ्याकडून येणारी वाहने दोंडाईचा – नंदुरबार मार्गे वळविण्यात येतील तर अंकलेश्वर – तळोदाकडून येणारी वाहने अनरद बारी मार्गे शिरपूरकडून कळविण्यात येतील .जागो जागी रहदारी व अडथाळा रोखण्यासाठी कंट्रोल रूम असेल . प्रत्येक विभागाचे कर्मचारी या विभागात कार्यरत असतील . घोडे बाजार , भांडी बाजार व विविध ठिकाणी पोलीस चौकीसह मदत केंद्र उभारले जाईल . बैठकीत उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी पशुसंवर्धन विभागाने घोडय़ांची आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे यात्रा कालावधीत अग्नीशमन दलाच्या गाडय़ा तत्पर ठेवाव्यात . यात्रेचा पूर्ण आराखडा तयार करून पेक्षनिय स्थानावर लावावीत जेणेकरून भाविकांना व पर्यटकाना यात्रेची यथोचित माहिती मिळेल असे आदेश दिले . तसेच नंदुरबार , शहादा , तळोदा व शिरपूर पालिकेनेच रोटेशन पद्धतीने आपापले अग्नीशामक दल तत्पर ठेवावेत . ग्रामविकास विभागाने जागा देतांना दक्षता घ्यावी . प्रत्येकाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व प्रत्येक विभागाने पथकांतील कर्मचा : यांचा मोबाईल नंबर एकमेकांजवळ ठेवावेत . व्हाट्सएपच्या माध्यमातून समूह बनवावेत . यात्रोत्सवात आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे व तात्काळ सेवा उपलब्ध करून द्याव्यात . तसेच प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचा : यांनी आपापले भ्रमणध्वनी कार्यान्वित ठेवावे .बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , तहसीलदार मिलिंद कुलकर्णी , पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ , गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , मुख्य कार्यकारी अधिकारी शहादा नगरपालिका दिनेश सिनारे , वाहतूक नियंत्रक कुलकर्णी , वीज वितरण उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप , सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता , पशुसंवर्धन अधिकारी डॉ दहाळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी , दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अंबालाल पाटील , उपाध्यक्ष रवींद्र पाटील , सचिव भिक्कन पाटील , रमेश पाटील आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन पुरुषोत्तम आगळे तर आभार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले . कार्यक्रमासाठी चेतक फेस्टीवल समितीचे सदस्य व ग्रामपंचात कर्मचा : यांनी परिश्रम घेतले . यानंतर सर्व अधिकारी व कर्मचा : यांनी घोडे बाजार व यात्रा परिसराची पाहणी केली .
Users Today : 32