औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
घरात शिरून माय लेकाला चौघांनी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एन-७, अयोध्यानगर भागात घडली. किशोर भास्कर लक्कस (३९, एन-७, सिडको, अयोध्यानगर ) हे घरी असताना आरोपी धम्मपाल प्रधान, विजय जाधव, सुखदेव साळवे आणि एक महिला घरात घरात शिरले. त्यांनी किशोर आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करून दांड्याने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 12