बुद्ध विहारात थायलंड, अमेरिका ,भिक्खू  आर्यादाऊम ग्रुप हस्ते   वही,बिस्किटे वाटप 

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर थायलंड, अमेरिका USA येथिल बोद्धधम्म गुरू भिख्खूसंघ हे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी भेट दिल्यानंतर औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले थायलंड येथील भन्ते प्रा.सिटीचोक अचांग(लकी भन्ते) यांनी सर्व भन्ते यांना  सायंकाळी फर्दापूर  येथे बुद्ध विहारात घेऊन  आले. सर्व भिक्खू संघ  भन्ते जी यांनी सर्वप्रथम  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.  बुद्ध विहारात  त्रिसरण पंचशील बुद्ध  वंदना घेण्यात आले  त्यानंतर 90  लहान मुलांना एक वही,दोन बिस्किट पुडे व बुद्ध विहारासाठी छोटेशे धम्मदान देण्यात  आले. यावेळी थायलंड,अमेरिका, येथील भन्ते नाराकारन चॉवनापोल, हारिकोरन, सिनलूरनम, वेनयांगवूह दालावोनग,प्रा.सिटीचोक अचांग,भन्ते  आर्यादाऊम ग्रुप (अमेरिका) माजी ग्रा.सदस्य,भीमा बोराडे,विशाल शिंदे,राजू शिंदे,अभय दामोदर, सुमित शिंदे,रंजित जगताप, पत्रकार प्रविण तायडे, व बोद्ध
उपासक,उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *