सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथे जागतिक वारसा स्थळ सप्ताह अंतर्गत पहूर येथे श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे उद्या शुक्रवार नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत मंदिर परिसरात श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येणार आहे .युनेस्को तर्फे दरवर्षी१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा स्थळ सप्ताह साजरा केला जातो .या अंतर्गत वारसा स्थळांचे जतन संरक्षण , संवर्धन , स्वच्छता ,जनजागृती अभियान राबविण्यात येते .याच अनुषंगाने पहूर येथील देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे पहूर पोलीस स्टेशन , ग्रामपंचायत पहूर कसबे व गृप ग्रामपंचायत पहूर पेठ , सांगवी , खर्चाणे यांच्या सहकार्याने मंदिर परिसरात देवळी आणि गोगडी नद्यांचे संवर्धन , मंदिर परिसरातील कचर्याचे व्यवस्थापन , पुरातन वास्तूंचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तरुणांनी -विद्यार्थ्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक कार्यास भार लावावा , असे आवाहन श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचे पुजारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले आहे .
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5