सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वच स्वच्छता गृहांना तोरण, लायटिंग, आणि पताका व फुलमाला चढविल्या होत्या. त्यामुळे जागतिक शौचालय दिनी तालुक्यातील सर्वच सार्वजनिक स्वच्छता गृहे चकाकली होती. जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक स्वच्छता गृहांचा वाढदिवस अनोख्य पद्धतीने साजरा केला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी या उपक्रमात हजेरी नोंदविली. जरंडी ग्रामपंचायत कार्यालयाचावतीने चारही सार्वजनिक स्वच्छता गृहांना तोरण, पताका, लायटिंग लावली होती. आणि यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी स्वच्छता गृहांचे व स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे यांच्या कल्पकतेने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे स्वच्छतेत व गावविकासामध्ये जरंडी अव्वालस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सरपंच वंदना पाटील, उपसरपंच संजय पाटील, माजी सदस्य संजीवन सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे, अमृत राठोड, संतोष पाटील आदींनी पुढाकार घेतला होता.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5