प्रविण चव्हाण
नंदुरबार – : मुलांची काळजी व सरंक्षण अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे, या समितीत बालकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व मानसोपचार तज्ञ अशा दोन अशासकीय अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तिंनी 3 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहातील एक सदस्य व बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ञ अशा दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे
Users Today : 32