माउलींच्या गजराने दुमदुमली पिंपळखुटा नगरी

KHOZ MASTER
1 Min Read
 टाळ मृदंगाच्या गजरात पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता
योगेश नागोलकार  राहेर
पातुर तालुक्यातील पिपंळखुटा येथे ज्ञानराज माऊली सभा मंडप मंदीर परिसरात गत ४२ वर्षांपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यंदाही परंपरा कायम राखत भावीक भक्तांनी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले होते.दि.२४ नोव्हेंबर रोजी सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी अवघी पिंपळखुटा नगरी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गजराने दुमदुमली होती. पारायण सोहळ्याच्या सांगतादिनी महिलांनी विशेष तयारी करीत पहाटेच्या सुमारास अंगणात रांगोळी काढल्या होत्या तसेच ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची गावातून टाळ- मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली. ज्ञानेश्वरी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. या सप्ताहाची सुरुवात दिनांक 15 नोव्हेंबर पासून झाली होती. तर सांगता दिनांक 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या सोहळ्यात हजारो भावीक,- भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळ्यात काकडा आरती, प्रवचन, हरिपाठ, पारायण वाचण, दीपोत्सव ,विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूत प्रतिसाद लागला.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *