सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मौजे पळाशी येथे सोयगाव कॄषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक राधिका सोळुंके व गावकरी यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून रब्बी हंगामात पिकांना व उन्हाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता लोकसहभागातून कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते.या कामी गावातील शेतकरी बंधूंनी कृषी विभागासोबत उत्स्फूर्त सहभाग घेऊन काम पूर्ण केले आहे व भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात केली आहे. यावेळी उपसरपंच सुभाष वाडेकर यांच्या हस्ते व गावातील प्रगतशील शेतकरी तसेच कृषि विभागातील कृषि पर्यवेक्षक हेमंत देशमुख, बि टी एम अमोल महाजन, कृषि सहाय्यक राधिका सोळुंके, संभाजी पाटील, जयश्री वाघ यांच्या उपस्थितीत जलपुजनाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5