सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव बस आगारातील बस या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मध्ये धावतात या ठिकाणी दोन प्रकारच्या बसेस चालवतात एक साधी बस तिकीट 25 रुपये एक एसी बस तिकीट 30 रुपये शुल्क आकारले जातात व 4 किलोमीटर अंतराचा प्रवास करण्यासाठी सर्रासपणे लूट चालू आहे याकडे मात्र कोणीही दखल घेताना दिसून येत नाही दी:२४ रोजी सायंकाळी 5:15 वाजता लेणी जवळील बस स्थानक वर काही प्रवासी महिला उभ्या होत्या त्यानीं चालक ,वाहक यांना विनंती केली की दादा थंडीच्या दिवसात तुम्ही सायंकाळी एसी बस लावत आहे आमच्या सोबत लहान मुले आहेत तुम्ही 3 वर्षाच्या मुलांचे सुद्धा तिकीट घेतात हा कुठला नियम आहे. साधी बस लावा आम्ही त्या बस मध्ये बसतो तेव्हा एका वाहक ने महिलांना सांगितले ताई ही एसी बस पूर्णपणे सीट भरल्यानंतर आम्ही साधी बस लावणार अशी बेजबाबदार पणाची भाषा करण्यात आली. महिलांना तो पर्यंत उभे राहून साधी बस ची प्रतीक्षा करावी लागली हा प्रकार पर्यटकांन साठी नवीन नाही दररोज अशा प्रकारे पर्यटकांना खूप मोठा त्रास,मनस्ताप सहन करावा लागतो. सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे हे मनमानी कारभार करून थंडीच्या दिवसांत चालक,वाहक यांना AC बस चालवायला सांगतात याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत त्यानीं याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 12