सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
फर्दापूर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान,खासदार अरविंद सावंत हे बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करून दिनांक:-25 नोव्हेंबर रोजी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी आले असता भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी, भगवान वराडे यांनी लेणी क्रमांक 1,2,4,9,10,12,16,17,19,26 या महत्त्वाच्या लेण्या बद्दल मार्गदर्शन केले. खासदार अरविंद सावंत यांनी आवर्जून बुद्ध लेणी मधील हस्तकला, शिल्पकला गौतम बुद्ध यांच्या जिवनावरील जातक कथा, खनिजा पासून तयार केलेली 2200 वर्षांपूर्वी ची पेंटिंग आज रोजी टिकून आहे. यावर माहिती घेऊन ते भारावून गेले. आपल्या महाराष्ट्र राज्यात इ.सन 500 शताब्दी मध्ये लेण्या कोरल्या हे आपले भाग्य आहे.राजे महाराजे यांनी त्यावेळी दान देऊन कोरीव काम केले. आज रोजी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी याची देखरेख व जतन करत आहेत स्वच्छता, सुद्धा चागल्या प्रकारची आहे.मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. अजून जास्तीत जास्त लेण्यावर भर देणे गरजेचे आहे.हा वारसा जतन करावा आपल्या महाराष्ट्र साठी अभिमानाची बाब आहे.असे त्यानीं बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी के.के.शेख,भारत काकडे,भगवान वराडे, सुरक्षा रक्षक गार्ड, फिलिप देसाई, कर्मचारी राजेंद्र बनसोडे,सलीम शहा,योगेश मोहिते,प्रविण तायडे, आदि उपस्थित होते.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5