बोगस हमाल कामगारांची पाठराखण करणाऱ्या सचीववाच्या निलंबनाची रिपब्लीकन सेनेकडून मागणी.

KHOZ MASTER
2 Min Read
चिखली कृषी उत्पन्न बाजार  समिती मधील हमालांच्या मतदार यादी मध्ये बोगस कामगार हमालांची नावे समाविष्ट असल्याने खरे हमाल कामगार दुर्लक्षित केल्या जात आहेत. बोगस हमाल कामगारांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बोगस हमाल कामगारांचा सुळसुळाट  असल्याचे रिपब्लीकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांच्या निदर्शनात आल्याने. दिनांक १८/११/२०२२ रोजी जिल्हा अधिकारी साहेब व निबंधक अधिकारी यांच्याकडे बोगस हमाल कामगारांची चौकशी करून त्यांचे हमाली परवाने रद्द करण्यात यावे म्हणुन निवेदन दिले होते.
त्या निवेदनात काही बोगस हमालांची नावे अधोलीखित करून त्यांचे हमाली परवाने रद्द करण्याची मागणी निवेदनात रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली होती जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक साहेब यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने व त्या बोगस हमालांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजकीय दबावापोटी पाठीशी घालत असल्याने आज दिनांक २५/११/२०२२ रोजी जिल्हा निवासी अधिकारी साहेब यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाच्या निलंबनाची मागणी व बोगस हमलांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.
या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास २८/११/२०२२ रोजी रिपब्लीकन सेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, बुलढाणा जिल्हा महासचिव सलीमभाई, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाउ  साळवे, बुलढाणा जिल्हा कामगार अध्यक्ष रहेमान भाई, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल मोहम्मद, दीपक गवई रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *