बुलढाणा (प्रतिनिधी) :
नोव्हेंबर रोजी जि.प. उर्दू प्राथमिक शाळा अंबाशी येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक हक्क, शोषणविरोधीचा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहे, असे मत यावेळी समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रहीम, मुख्याध्यापक अकिल सौदागर सर, सय्यद राहत सर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलशाद खा पठाण, माजी सरपंच रामेश्वर काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज गवई, युवा सामाजिक कार्यकर्ता सय्यद याहीया, सय्यद ताहेर, हसन कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर, सदस्य वसीम मौलाना, सै.नासेर, सै.ईसराईल, शेख सादिक, शेख मुरसलिम, शेख चाँद कुरेशी, जावेद खान, नंदकिशोर शेजुळ आदी उपस्थित होते.
मोहसिन खान बिसमिल्ला खान
मु.पो.अंबाशी, ता.चिखली, जि.बुलढाणा ४४३२०१
मो.नंबर ९२८४९६१२२९
