सिल्लोड येथे संशयावरून एकाचा खून पती, पत्नीसह दोन अनोळखींविरोधात  गुन्हा दाखल

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे  संशयावरून एकाचा खून झाल्याची घटना शहरातील आनंद पार्क परिसरात गुरुवार दि.२४/११/२२ संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती, पत्नीसह दोन अनोळखींविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात पती, पत्नीस अटक करण्यात आली.याप्रकरणी इब्राहिमखान हाजी दौलत खान पठाण यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा फारूकखान इब्राहिमखान पठाण हा अंधारी येथील उर्दू शाळेमध्ये शिक्षक असून, तो कुटुंबासह अंबादासनगर सिल्लोड येथे राहतो. ते कामानिमित्त औरंगाबाद येथील दुसऱ्या मुलाकडे गेले असताना त्यांना सिल्लोड येथून गुरुवार (ता. २४) रोजी रात्री गेला. साडेनऊच्या सुमारास फोन आला फारूकखान पठाण याच्यावर काही लोकांना प्राणघातक हल्ला केला. त्याला सिल्लोड येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दवाखान्यात आल्यानंतर त्यांना समजले की, त्यांच्या मुलाची उदय ऊर्फ मुन्ना कुलकर्णी यांच्यामार्फत आनंद पार्क येथील गीता शामधन बैनाडे हिच्याशी ओळख झाली.गुरुवारी फारूकखान पठाण हा संध्याकाळी आनंद पार्क येथे तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. साडेआठच्या सुमारास तिचा पती शामधन बैनाडे हा घरी आला.फारूकखानला पाहून संशयावरून त्याने घरासमोरच फारूकखान पठाण याच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारून त्यास रक्तबंबाळ करून जखमी केले. तेव्हा त्याच्या फोनवर मुन्ना कुलकर्णी याचा फोन आल्याने गीताने त्यास घडलेली घटना सांगितली. मुन्ना कुलकर्णी याने रुग्णवाहिकेतून फारूकखान पठाण यास घटनास्थळावरून सिल्लोड येथील उपजिल्हा
▪️पोलिसांचा बंदोबस्त▪️,,,घटनेची बातमी रात्रीच्या सुमारास शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सकाळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास मृत फारूकखान पठाण याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शहरातील कब्रस्तानात की, त्यांचा मुलगा फारूकखान पठाण दफनविधी करण्यात आला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान फारूकखान पठाण याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शामधन बैनाडे, त्याची पत्नी गीता बैनाडे यांच्यासह दोन अनोळखीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शामधन बैनाडे व त्याची पत्नी यांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज करीत आहेत.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *