तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषि महाविद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष , लोकशाही गनराज्य घडविण्याचा तसेच विचार , अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा आणि उपासना याचे स्वतंत्र तसेच दर्जाची व समान संधीची समानता निश्चितपने प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करन्यात आला.
भारतीय संविधानाच्या प्रस्थाविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन संविधाच्या प्रस्थाविणचे वाचन केले तसेच ऑनलाईन प्रश्नावली सोडवून प्रमाणपत्रे मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम काकड यांनी केले. यावेळी रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम, प्रा. मोहजीतसिंग राजपूत, प्रा. नारायण बोडखे, प्रा. सचिन सोळंकी, प्रा श्वेता धांडे, प्रा. सोनाली इंगळे, अर्चना जत्ती व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 65