शहादा_ असलोद रस्त्यावरील सावखेडा नजीक 7 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त , स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहादा तालुक्यातील शहादा – असलोद रस्त्यावरील सावखेडा गावाजवळ अवैध दारू वाहतूक करणारी वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण नंदुरबार यांनी जप्त केले . अवैध मद्यसाठासह वाहन असा सुमारे आठ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार , असलोद- शहादा रस्त्यावर अवैध रित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांना मिळाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सावखेडा गावानजीक अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पांढऱ्या रंगाची टाटा एस मालवाहू ( क्र . एम . एच .१२ , ए.डि .५०१ ९ ) वाहन थांबवुन तपासणी केली असता तीच्यात अवैधरित्या विनापास परमिट शिवाय विदेशी दारू कब्जात बाळगुन तीची चोरटी वाहतुक करतांना मिळून आला .
     त्यात रॉयल ब्लु व्हिस्की नावाच्या दारूच्या बाटल्या त्याची किंमत सुमारे पाच लाख ९ ४ हजार किमतीचा तसेच दोन लाख किमतीची मालवाहू वाहन असा सात लाख ९ ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . दारूची वाहतूक करणारा मनिष शिवाजी नगराळे रा . दोंडाईचा , ता शिंदखेडा जि धुळे याला अटक करण्यात आली असून ,पुढील तपास पोलीस करीत आहे .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *