प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
जिल्हात गुजरात विधानसभा निवडणुकीचा पाश्वभुमीवर अवैद्य दारु साठ्यावर नवापूर पोलिसानी कार्यवाही केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलिस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुप्त माहीती वरुन सायंकाळी ४:३० वाजता नवापूर तालुक्यातील रायपूर गावाजवळील हॉटले डी.एन. डी . व त्यांच्या जवळील ऊसाचा शेतात देशी वेदेशी दारु अवैद्यसाठा एकुन दोन लाख पन्नास हजार किंमतीचा माल मिळुन आला.हॉटेल चालक व मालक भाविन रमेश कोकणी रा . रायपूर ता नवापूर याला नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक वारे , सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ , अ.स इ विकास पाटील , गुमानसिंग पाडवी , नरेंद्र नाईक , योगेश थोरात , प्रेम जाधव , कैलास तावडे , पंकज सुर्यवंशी ,तसेच पोलिस मुख्यालयाचे आर सी पी प्लॉटून चे कर्मचारी यांनी केली आहे .
Users Today : 32