प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
तालुक्यातील मांजरे गावादरम्यान ऊसतोड ते ओसर्ली मजूरांना घेवून जाणारी पिकअप वाहन उलटल्याने एक वर्षाची मुलगी ठार तर ऊसतोड मजूर जखमी झाल्याची घटना घडली . याप्रकरणी पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथील ताऱ्या नाऱ्या पावरा हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनामध्ये ( क्र . एम.एच. ४३ एडी ०५३० ) ऊसतोड मजूरांना घेवून मांजरे ते ओसर्ली रस्त्याने जात होता . यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याने अपघात घडला घडलेल्या अपघातात विद्या रविंद्र पवार ( वय १ वर्ष , रा.जुगनीपाडा ता.धडगाव या मुलीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला . तसेच ऊसतोड मजूरांनाही दुखापत झाली . याबाबत कासाऱ्या धनंजय पावरा यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालक ताऱ्या नाऱ्या पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ , १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . अनिल सोनवणे करीत आहेत .
Users Today : 32