माळी युवक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होत आयोजन

योगेश नागोलकार राहेर
पातुर तालुक्यातील पिपंळखुटा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जय बजरंग व्यायाम शाळा,माळी युवक संघटना, महात्मा फुले समता परिषद, महात्मा फुले डोनर ग्रुप,व समस्त गावकरी मंडळी यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप संस्थापक अध्यक्ष माळी युवक संघटना व सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश तायडे , यांच्या कडून मोफत चष्मे वाटप केले कार्यक्रमाचे आयोजन माळी युवक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.भवानी माता मंदीर कार्यालय परिसरात रक्तदान शिबिर पार पडले व नेत्रदान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय शेत पार पडले. महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले माजी ग्रामसेवक जयरामजी माडोकार, माजी आमदार बळीराम शिरस्कार, माळी युवक संघटना संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे,माजी सभापती पंचायत समिती पै.बालुभाऊ बगाळे, श्रीराम सेना विदर्भ संघटक मंत्री, ब्लड डोनर संचालक तुषार जंगले, सरपंच अल्का सुभाष वाहोकार, यांच्या सह आदी गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये परिसरातील राहेर,उमरा, सावरगाव,बोथा, पिंपळखुटा येथील नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.दीनांक २८ नोव्हेंबर रोजी जयश्रीताई गोपाल खोंड यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
Users Today : 65