चिखली

रिपब्लिकन सेनेच्या वतीने बोगस हमाल कामगारांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे सह विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांना निवेदन दिले होते.रिपब्लिकन सेनेच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा दुय्यम निबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांना तत्काळ प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी आंदोलनाचा धसका घेऊन बोगस हमाल कामगारांचा परवाना रद्द करणे, नवीन हमाल कामगारांचे अनुज्ञापती साठी आलेले अर्ज निकाली काढणे या मागण्या मान्य करुन एका महिन्यात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले असुन रिपब्लिकन सेनेचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे पत्र रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांना दीले. रिपब्लीकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी सांगितले की न्याय व्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्वास असून कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी २८/११/२०२२ ला होणाऱ्या आंदोलनाचा धसका घेऊन बोगस हमाल कामगारांवर चौकशी करून कारवाई सह ईतर मागण्या मान्य करण्याचे लेखी आदेश दिल्याने तूर्तास आंदोलनाला स्थगिती देण्यात येत आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर दिलेल्या कालावधीत कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असे तोंडी इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व मुख्य प्रशासक यांना आदेशाची प्रत घेतांना दिला यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीम भाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा भाऊ साळवे, जिल्हा कामगार अध्यक्ष रहेमान खान, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, दीपक गवई सह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 33