प्रतिनीधी रवि मगर
समय बुद्ध विहारात संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सरपंच सौ अर्चनाताई वसंत जाधव यांच्या समवेत सर्व महिला मंडळांनी दीप प्रज्वलित करून महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर कुमारी त्रिवेणी वसंत जाधव यांनी छोटेसे भाषण दिले. संघदीप प्रकाश निकाळजे याने संविधानावर गीत गायन केले. यानंतर अशोक दामोदर वाडखेडे यांनी संविधानाविषयी सखोल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार समाधान वानखेडे, किशोर निकाळजे, बादल जाधव, राहुल छेडेदार, बाळू वानखेडे, गजानन जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वसंत नामदेव जाधव यांनी केले.
Users Today : 23