रमाई आवास योजनेच्या लाभार्थीचा केला मुसद्दीलाल प्रशासनावरून भरोसा उठल्यामुळे लाभार्थ्याचे माजी उपसभापती यांना साकळे

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर 

पंचायत समिती पातूर अंतर्गत येत असलेल्या ग्राम पिंपरडोळी येथील रमाई आवास योजनेच्या लाभार्थीसोबत अक्षरशः ऑफिस-ऑफिस खेळल्या जात असून सदर लाभार्थ्याचा मुसद्दीलाल केल्याचा प्रताप पातूर पंचायत समितीकडून केल्या जात आहे.
 पंचायत समिती पातूर अंतर्गत येत असलेल्या पिंपरडोळी ग्रामपंचायत येथील रहिवासी असलेल्या महादेव लक्ष्मण अडागळे यांचे नावे सन 2018 मध्ये रमाई घरकुल आवास योजनेच्या पात्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर नाव होते,असे असतांना संबंधित लाभार्थी यांनी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली होती.त्याचदरम्यान सदर लाभार्थी यास घरकूल चा चेक काढण्यासाठी खाजगी दलालांमार्फत पैश्यांची मागणी केल्या गेली होती.घरकूल लाभार्थी महादेव लक्ष्मण अडागळे रा.पिंपरडोळी ता.पातूर जि. अकोला यांनी कुठल्याही प्रकारची लाच देणार नाही असा पवित्रा घेतला असून *”माझे घरकूल हे नियमांना अनुसरून आहे,तरीदेखील मला पैशांची मागणी होत असून हेतुपुरस्सरपणे मला सदर योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.”संबंधित प्रकरणातील रमाई आवास योजनेतील लाभार्थी नामे महादेव लक्ष्मण अडागळे रा.पिंपरडोळी यांचा घरकुलच्या रमाई आवास योजनेच्या 2018 च्या ठराव क्र.6 च्या पात्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर नाव असून संपूर्ण यादीतील इतर लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला असून नेमके तिसऱ्या क्रमांकाचे लाभार्थीस डावलून दिले असल्याने महादेव अडागळे यांनी तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या दि. 6/8/2918 रोजी जनता दरबारात अर्ज क्र.316 व त्याव्यतिरिक्त दोन अर्ज,अकोला जिल्हाधिकारी यांना 9 अर्ज,जि. प.मुख्याधिकारी यांना 5 अर्ज, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना 2 अर्ज व पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तब्बल 20 अर्ज केले, तरीदेखील संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची दखल नं घेतल्या मुळे एवढे कार्यालय फिरून देखील काम झाले नसून सदर लाभार्थीचा प्रसिध्द टीव्ही सिरीयल ऑफिस-ऑफिस च्या मुसद्दीलाल प्रमाणे हाल झाले आहेत.सदर प्रकरणात लाभार्थी महादेव लक्ष्मण अडागळे यांनी आपला हक्क मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले,असंख्य कार्यालयाचे उंबरठे झिजवले,तरीदेखील न्याय मिळाला नसल्याने शेवटी सर्व व्यवस्थेवरून विश्वास उठल्यामुळे शेवटी पातूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती व तत्कालीन सदस्या अर्चना डाबेराव यांना विनंती अर्ज करून न्याय देण्याची अपेक्षा केली आहे.याप्रकरणी माजी उपसभापती व तत्कालीन सदस्या अर्चना डाबेराव यांचेशी संवाद साधला असता सदर लाभार्थ्यास त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रसंगी उपोषण देखील करणार असल्याचे त्या बोलल्या.
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *