चिमुकल्यांनी साधला पोलीस दादांशी संवाद पहूरच्या डॉ . हेडगेवार विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम 

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या चिमुकल्यांनी पहूर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस दादांशी संवाद साधला.भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ .हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या चिमुकल्यांची पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पहूर पोलीस ठाणे येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी पोलीस दलाच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . पोलीस दादा हे जनतेचे मित्र असतात . कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सदैव कार्यमग्न असतात , असे सांगून चिमुकल्यांच्या मनात पोलीस दलाविषयी प्रेरणा निर्माण केली .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शस्त्रागाराला  देखील भेट देऊन बंदूकीच्या कार्यप्रणाली विषयी माहिती जाणून घेतली . प्रदिप चौधरी यांनी बंदुकीच्या वापरासंबधी माहिती दिली. गोपनीय शाखे विषयी गोपाल माळी यांनी मार्गदर्शन केले .गुन्हे शाखे संदर्भात विनय सानप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला .यावेळी ज्येष्ठ शिक्षक अमोल क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले  . पदवीधर शिक्षक युनूस तडवी यांनी आभार मानले . यावेळी पोलीस कर्मचारी राहूल जोहरे , रविंद्र देशमुख , अनिल राठोड , विनोद पाटील , सत्यवान कोळी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *