सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव कृषी विभागामार्फत पोषण आहार भाजीपाला किटचे वाटप तालुका कृषि अधिकारी सोयगांव एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध गावात पोषणआहार भाजीपाला किटचे वाटप करण्यात येत आहे.सदरील योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पोषणमूल्याअभावी होणारे कुपोषण कमी करणे, पोषणयुक्त – संतुलित व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे या प्रकारची उद्दिष्टे साध्य केली जात आहेत. सदरील योजनेअंतर्गत तालुक्यातील 833 कुपोषित बालके असलेल्या कुटुंबांची निवड गावातील अंगणवाडी सेविका यांचे मार्फत करण्यात येत असून प्रथम टप्प्यात सोयगांव तालुकयास 333 भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले आहे तसेच द्वितीय टप्यात 500 भाजीपाला किट वाटप करण्यात येत आहे.त्यानुसार तालुक्यात दि.27-11-2022 रोजी मौजे – वरखेडी बु. येथील कुपोषित बलकांच्या कुटुंबीयांना भाजीपाला किट माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, बबलू शेठ, सरपंच व उपसरपंच यांचे हस्ते कृषि पर्यवेक्षक हेमंत देशमुख, बी.टी.एम. ए.एस.महाजन व कृ.स.एस.एस.चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
