श्री . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरावर चिमुकल्यांसाठी उभारणार बालोद्यान – शिवभक्त रंगनाथ महाराज

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘करील मनोरंजन जो मुलांचे ..जडेल नाते प्रभूशी तयाचे .. ‘या परमपूज्य साने गुरुजींच्या उक्ती नुसार श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात येणाऱ्या काळात लवकरच आजन्म भिक्षा झोळीद्वारे  जमा झालेल्या लोकवर्गणीद्वारे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव बालोद्यान उभारणार असल्याचे प्रतिपादन शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले . ते महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ .हेडगेवार प्राथमिक विद्यालयातर्फे आयोजित क्षेत्र भेट सहली प्रसंगी विद्यार्थ्यांशी साधताना बोलत होते.पहूर पासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर जामनेर -पाचोरा मार्गावर निसर्ग सौंदर्याने नटलेलं श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थान हे देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले शिवकालीन महादेव मंदिर असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे विवाह सोहळे ,  शालेय विद्यार्थ्यांच्या सहली , नवसाचे कार्यक्रम होतात . या परिसरात चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीतून बालोद्यान ( चिल्ड्रन पार्क ) उभारले जाणार आहे . या चिल्ड्रन पार्क साठी दानशूर भाविकांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ घसरगुंडी झोपाळे सि – सॉ या सारखी  खेळणी भेट द्यावी , असे आवाहन श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले . यावेळी शिक्षक अमोल क्षीरसागर युनूस तडवी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते . महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही महाराजांनी केले .

 

गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *