सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे सुमारास फरदापूर येथे एक Ashok Leyland वाहन फरदापूर ते अजिंठा रोडवर हॉटेल गझल समोर पलटी झाला सदर वाहनातील चालक याने त्याचे ताब्यातील अशोक लेलँड छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच 20इएल 9965 मध्ये विनापरवाना जनावराची वाहतूक करून त्याच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता तसेच पशुवैद्यकीय अधिकारी करवी सदर जनावराची वैद्यकीय तपासणी न करता क्षमतेपेक्षा अधिक गाईची दाटीवाटीने व त्यांना उगाच वेदना किंवा यातना होतील अशा स्थितीत सदर गाईची भूक तहान अति गर्दी यामुळे केलेल्या वेदनाने पीडित करून कतलीच्या उद्देशाने कतलीच्या उद्देशाने आंतरराज्य मधून निर्दयतेने वाहतूक करून घेऊन जात असताना त्याच्या ताब्यातील वाहन दारूच्या नशेत रोडची परिस्थिती लक्षात न घेता भरदा वेगात वाहन चालून सदर वाहन रोडच्या कडेस डिव्हायडरला धडक देऊन पलटी केले व स्वतःचे व सहकारी यांचे दुखापतीस कारणीभूत झाले व कृषी पशुवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र जा क्र संकीर्ण2020/प्र.क.53/पदुम-4 दि.30/09/2022 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोस्टे फर्दापूर येथे गुन्हा रजि.क्र. 165/2022 प्रमाणे गुन्ह दाखल करण्यात आलेला असून जखमी गायींना वैद्यकीय उपचार करुन गोशाळेमध्ये भरती करण्यात आलेले आहे. पुढील तपास सपोनि डी.बी.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. निलेश लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5