मंत्रालयात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण.

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार 
 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण…
 मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
    क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली . या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रा समवेत लावण्यात यावीत अशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती . पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भुजबळांनी याबाबत चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तात्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते . त्यानुसार नुकताच शासन निर्णय देखील काढण्यात आला होता . त्यानुसार आज महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले .
चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले
तैलचित्र मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले सदर ऐतिहासिक तैलचित्र आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले आहे . यावेळी माजी खासदार समीर भुजबळ , माजी आमदार पंकज भुजबळ , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव , अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , अपर मुख्य सचिव भूषण गगराणी , प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *