तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकराशे खेळाडू सहभागी.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत २७ व २८ , २ ९ तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे . कार्यक्रमाच्या उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ . सुप्रिया गावित यांचा हस्ते करण्यात आला , प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , प्रकल्पाधिकारी मिनल करनवाल , लक्ष्मण माळी उपस्थित आदी होते.नंदुरबार प्रकल्प अंतर्गत नवापूर , नंदुरबार व शहादा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रत्येकी 12 संघ सहभागी होणार आहे . क्रीडा स्पर्धेत ५४७ मुले व ५३३ मुली असे एकूण १०८० खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहेत . या स्पर्धेत पहिल्या दिवशी कबड्डी , खो – खो , व्हॉलीबॉल , हँडबॉल हे सांघिक खेळ तर दुसऱ्या दिवशी धावणे , गोळाफेक , भालाफेक , थाळीफेक , लांबउडी , उंचउडी असे वैयक्तिक खेळ होणार आहे .आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत मोठा उत्साह दिसून आला . स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस . एन . काकडे , एस.एल.हिप्परगे , जिजा पाडवी , किशोर गोसावी , राहुल पवार , शैलेश पटेल , एस . एम.चौधरी , एन.आर.माळी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *