चिखली
नोव्हेंबर रोजी मुंबई ठाणे येथिल महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आयोजित केले होते, त्या शिबिरात योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांना संबोधित करतांना समोर हजारो महीला असातांना संस्कृती विसरून असभ्य असे उद्गार काढले ज्या मुळे महिला व जनसामान्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविले की रामदेव बाबाचे वक्तव्य असभ्यतेचे शिखर गाठणारे आहे.
महिला साड्या नेसून पण चांगला दिसतात सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या दिसतात तर माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे असभ्य वादग्रस्त वक्तव्य रामदेव बाबा यांनी महिला बद्दल केल्याने त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महिलांचा अपमान झाला आहे, बेताल वक्तव्य करणाऱ्या अश्या लोकांना कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणे करुन भविष्यात महिलांचा अपमान होणार नाही. आपल्या अकलेचे तारे तोडून बेताल वक्तव्य करणाऱ्या रामदेव बाबा यांच्यावर महाराष्ट्र सरकारने तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, रामदेव बाबा यांनी संपूर्ण देशातील महिलांचे त्वरित माफी मागावी,
निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास रामदेव बाबा यांचे पतंजली उत्पादनाचे बायकॉट करून त्याच्या पतंजली निर्मित उत्पादनाची होळी करण्यात येईल, सदर निवेदन देतांना रिपब्लीकन सेना जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाउ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा कामगार अध्यक्ष रहमान खान, चिखली तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, चिखली तालुका युवा उपाध्यक्ष शेख वसीम, चिखली शहर उपाध्यक्ष रमेशभाऊ अंभोरे, चिखली शहर युवा अध्यक्ष शेखमालीक, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, चिखली शहर उपाध्यक्ष युवा अप्पू खान, दीपक तायडे, देवाभाई शिसागर, अरुण जाधव, सौरभ बावस्कर, शेख दानिश, अजय जाधव, प्रदीपभाऊ हिवाळे व इतर पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 37