चिखली प्रतिनिधी
शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त समाज बांधवांकडून दि.28 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल रॅली काढून विनम्र अभिवादन करण्यात आले.
समाज सेवक आणि थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्ताने समाज बांधवांनकडून अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. स्थानिक जुनेगांव परिसरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅली जुनेगाव मार्गे पंचायत समिती, राउतवाडी, खामगाव चौफुली मार्गे,छञपती शिवाजी महाराज चौक व जयस्तंभ चौक येथील अशोक वाटिकेत पोहचली. रॅली मार्गात असलेल्या महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रॅली अशोक वाटिकेत आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दुग्धभिषेख करून, पुष्पहार अर्पण करून सर्व समाजबांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पुण्यतीथी दिनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे आचार, विचार आचरणात आणावे अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली. यावेळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, युवक, व्यापारी, नगर सेवक, वरिष्ठ राजकारणी तथा सर्व क्षेत्रातील गणमान्य मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 37