दरा फाट्याजवळ २० लाखांची विदेशी दारू जप्त

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रा.भरत चव्हाण नंदुरबार
अवैधरित्या विनापरवाना विदेशीदारूची तस्करी करणारे वाहन शहादा पोलिसांनी काल पहाटेच्या सुमारास पकडले . यात 19 लाख 80 हजार रुपयाची विदेशी दारू व 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा सुमारे 24 लाख 80 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे . अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व त्याचा एक सहकारी वाहन सोडून पसार झाले आहेत . ही घटना शहादा – म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे घडली .याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार व पो.कॉ. अनमोल राठोड हे म्हसावद रस्त्यावर दरा फाटा येथे गस्त घालत असताना त्यांना एक वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येताना दिसले . त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पोलीसांच्या वाहनाला एका बाजूला धडक देऊन म्हसावद रस्त्याकडे वेगाने पळाले . या घटनेची माहिती तात्काळ म्हसावद पोलिसांना देण्यात आली . त्यांनी नाकाबंदी केली असता म्हसावद पोलिसांच्या वाहनालाही धडक देत संशयितांनीतोरणमाळ रस्त्याकडे पळ काढला . मात्र घाट रस्ता असल्याने चालकाने व त्याचा साथीदारासह वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले .पोलिसांनी बोलेरो वाहन ( क्रमांक एमएच 08 – एच- 8985 ) शहादा पोलीस ठाण्यात आणले . त्यात ब्लेंडर व्हिस्की ( Blender whiskey ) या विदेशी दारूने भरलेल्या 3 हजार बाटल्यांचे 250 खोके आढळून आले . या दारूची किंमत 19 लाख 80 हजार इतकी असून बोलेरो वाहनाचे 5 लाख असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .याबाबत पो.कॉ. अनमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीतांविरुद्ध विनापरवाना अवैधरीत्या दारूची वाहतूक व शासकीय कामात अडथळा आणणे , शासकीय वाहनास धडक देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन नेऊन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *