मालट्रकची दुचाकीला धडक ; पती – पत्नी जखमी.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हान‌ नंदुरबार
शहरातील धुळे रस्त्यावर हिरा एक्झिक्यूटीव्ह हॉटेलसमोर मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती – पत्नी जखमी झाल्याची घटना घडली .याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील प्रभाकर तिरमले व त्यांची पत्नी छाया प्रभाकर तिरमले हे दुचाकीने दोंडाईकडून नंदुरबारकडे येत होते . यावेळी एका मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक ( क्र . एम . एच . ४० एडी ६७ ९९ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात मालट्रक चालवून हिरा एक्झिक्यूटीव्ह हॉटेलसमोर दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला.घडलेल्या अपघातात प्रभाकर तिरमले व छाया तिरमले यांना दुखापत झाली .याबाबत छाया तिरमले यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मालट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३३७ , ३३८ , मोटार वाहन कायादा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पवार करीत आहेत .
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *